Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयएल्गार परिषद : शरजीलच्या 'त्या' वक्तव्यावरून फडणवीस आक्रमक, कठोर कारवाईची मागणी

एल्गार परिषद : शरजीलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून फडणवीस आक्रमक, कठोर कारवाईची मागणी

मुंबई / प्रतिनिधी –

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर

- Advertisement -

तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

३० जानेवारी २०२१ रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्ह आणि समस्त हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवितो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून त्याला अद्दल घडवाल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यमातून गेल्याही कालखंडात काय झाले, याची जाणीव असताना अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे, किती चूक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुद्धा खपवून घ्यायचे, ही भूमिका योग्य नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय लिहलय पत्रात?

भाषणादरम्यान शरजील उस्मानीने काय म्हटले होते ?

एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शरजील उस्मानीने म्हटलं की, हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलीसांनी एका वर्षात १९ लोकांची हत्या केली यात सर्वजण दलित होते किंवा मुस्लीम होते. हे लोकं लिंचिंग करतात. हत्या करतात, हत्या करून हे लोकं आपल्या घरी जातात, त्यावेळी हे लोक काय करत असावेत? काही नवीन पद्धतीने हात धूत असावेत किंवा काही औषधं मिसळून स्नान करत असावेत,” यावरून आता वाद निर्माण होत आहे. या वक्तव्यामुळं भाजपनं जोरदार टीकेला सुरुवात केलीय. असं वक्तव्य करण्याची हिंमत होतेच कशी, असा प्रश्न भाजपनं उपस्थित केलाय.

दरम्यान, शरजील उस्मानी याने हिंदु समाजाबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य तपासल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देेशमुख यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या