Sunday, April 28, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही

महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही

पुणे |प्रतिनिधी| Pune

महाराष्ट्रात (Maharashtra) कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी ओबींसींच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत (Controversial Statement) विचारले असता व्यक्त केली.

- Advertisement -

ओबीसींच्या (OBC) मुद्द्यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच याता राष्ट्रवादीचे नेते (NCP leaders) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad) यांनी ओबींसींच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओबीसींवर (OBC) माझा फार काही विश्वास नाही, कारण जेव्हा मंडल आयोग आलं तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं, असं विधान आव्हाड यांनी केलं आहे. यावरुन आता त्यांच्यावर टीकांचा (Criticism) भडीमार होत आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन माध्यमांनी अजित पवारांना प्रश्न केला होता. मात्र यावरुन अजित पवार चांगलेच संतापलेले पहायला मिळाले. महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये देखील हा मुद्दा पुढे आला आहे. तेही सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. इतर राज्यांमध्ये देखील अशाप्रकारचे मुद्दे येत आहेत. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे तो सगळीकडेच लागू होत असतो. त्यामुळे सर्वांनी यात कुठलंही राजकारण आणू नये, असे पवार म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडण्याची वेळ आली तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र दिलं नाही. आता मध्य प्रदेशच्या वेळी प्रतिज्ञापत्रंही दिलं आणि हरिश साळवी यांच्यासारखे मोठे वकील दिले,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या