भोंग्यांंबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे - खा. संजय राऊत

पंतप्रधानांना पत्र लिहिणार
भोंग्यांंबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे - खा. संजय राऊत

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गोवंश हत्याबंदीबाबत जसे धोरण बनवले, त्याच धर्तीवर केंद्र सरकारने भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे (Make a national policy on Loud Speakers ), अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut )यांनी बुधवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi )यांना पत्र लिहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray )यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्याने राज्यात भोंग्यावरून राजकारण पेटले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले की, जसे केंद्राने गोवंश हत्याबंदीसाठी धोरण बनवले, पण काही राज्यांना अपवाद केला, तसाच विचार येथेही करायला हवा.

राज्यातील भाजपचे लोक भोंग्यावरून राजकारण करत आहेत. त्यामुळे मोदींनी भोंग्याबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे. महाराष्ट्र नेहमीच राष्ट्रीय धोरणांचे पालन करत आला आहे.आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन आहे की, तुमच्या लोकांनी भोंग्याला घेऊन जी मागणी केली आहे, त्याला घेऊन एक राष्ट्रीय धोरण बनवावे. ते महाराष्ट्राला आपोआपच लागू होईल. हे धोरण गुजरात आणि बिहारमध्येही हे अवलंबवावे, अशी सूचनाही राऊत यांनी केली.

आता जे काही हिंदुत्वाच्या नावावर राजकीय भोंगे वाजत आहेत, हे ढोंग सुरु आहे. हे ढोंग फार काळ चालणार नाही. यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.