हल्ल्यांंप्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा- किरीट सोमय्या

उच्च न्यायालयात याचिका दाखल
हल्ल्यांंप्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी करा- किरीट सोमय्या

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Former MP Kirit Somaiya )यांनी मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court )दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

या याचिकेत सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे.

खार पोलीस ठाण्यात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करायला गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलीस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर दाखल केला.

या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआय कडे सोपवावा, असेही सोमय्या यांनी याचिकेत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.