Sunday, April 28, 2024
Homeराजकीयस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्थगितीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करा

मुंबई । प्रतिनिधी

इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी ) राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती मिळावी म्हणून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली.

- Advertisement -

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत धुळे, नागपूर, नंदुरबार, वाशीम, अकोला या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भाजपच्यावतीने राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांच्याकडे करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला निवडणूक घ्याव्या लागणार आहेत, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आल्याचे बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यामुळे आता राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करून या निवडणुकांना स्थगिती मिळवावी. ओबीसी आरक्षण तिढा सुटेपर्यंत या निवडणुकांना स्थगिती द्यावी अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केल्यास निवडणुकांना स्थगिती मिळू शकते, असे बावनकुळे म्हणाले.

राज्यातील आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला इम्पेरिकल डेटा सादर करण्यास सांगितले असताना राज्य सरकारकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या