ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली हायकोर्टाचं समन्स... प्रकरण काय?

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली हायकोर्टाचं समन्स... प्रकरण काय?

दिल्ली | Delhi

दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना समन्स बजावलं आहे.

कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये न्यायालयाने उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावलं आहे.

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली हायकोर्टाचं समन्स... प्रकरण काय?
अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

तसेच शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले “५० खोके एकदम ओक्के” हे वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाका, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 17 एप्रिल रोजी होणार आहे.

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली हायकोर्टाचं समन्स... प्रकरण काय?
नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात; दोन चिमुकल्यासह ५ जणांचा मृत्यू

खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर मानहानीचा दावा करण्यात आला आहे.

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊतांना दिल्ली हायकोर्टाचं समन्स... प्रकरण काय?
Mumbai-Pune Expressway : नागरिकांनो, मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'चा प्रवास महागणार कारण...

ही याचिका दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेत तिन्ही नेत्यांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत समन्स जारी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com