'आप फोडून भाजपात या आणि CBI-ED पासून सुटका मिळवा'

मनीष सिसोदियांचा मोठा दावा
'आप फोडून भाजपात या आणि CBI-ED पासून सुटका मिळवा'

मुंबई | Mumbai

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सध्या सीबीआयकडून (CBI) चौकशी सुरू आहे. उत्पादन शुल्क धोरणातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. अशात मनिष सिसोदिया यांनी मोठा दावा केला आहे.

आम आदमीला रामराम करून भाजपमध्ये या असा गंभीर आरोप सिसोदिया यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी भाजपने आपल्याला पाठवलेल्या संदेशात 'आप' सोडून भाजपमध्ये येण्याचा सल्ला दिला असून, असे केल्यास सीबीआय-ईडीची चौकशी बंद केली जाईल असेही भाजपकडून सांगण्यात आल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'मला भाजपचा एक संदेश आला आहे. आपला फोडून भाजपमध्ये या, सगळ्या सीबीआय, ईडीच्या केस बंद करु, असा खळबळजनक दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे.'

तसेच, 'सिसोदिया यांनी यावर भाजपला उत्तरही दिलं आहे. मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. राजपूत आहे एकवेळ माझे शिर कापून हातात देईन पण भ्रष्टाचारी आणि षडयंत्र रचणाऱ्यांसमोर झुकणार नाही. माझ्या विरोधातले सर्व आरोप खोटे आहेत. जे करायचे ते करा,' असं मनिष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com