राजनाथसिंह यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे 'ते' वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात

नेमकं काय म्हणाले राजनाथसिंह?
राजनाथसिंह यांचे शिवाजी महाराजांबद्दलचे 'ते' वक्तव्य वादाच्या भोवर्‍यात

मुंबई | Mumbai

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) आणि टोकियो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Gold medalist Neeraj Chopra) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात (Pune) नीरज चोप्रा याच्या नावाने स्टेडियमचं (Neeraj Chopra Army Stadium Pune) उद्घाटन पार पाडलं. यावेळी राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) बोलताना केलेल्या एका विधानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe) यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

'ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब यांनी लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले.' असं राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी म्हटलं होतं.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या विधानाचा तीव्र निषेध करत म्हंटले आहे की, 'छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर सुरुवातीच्या स्वराज्याच्या निर्मितीत दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशाहीच्या दरबारात शहाजी महाराजांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, अशी स्वामीनिष्ठा त्यापाठी होती. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची पहिली भेट ही १६७१ च्या आसपास झाल्याचे काही ऐतिहासिक कागदपत्रे दाखवून देतात. त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वास आलेले होते.'

तसेच, "केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल केलेल्या विधानाचा केवळ निषेध करून भागणार नाही. तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला जाज्वल्य इतिहास वेगवेगळ्या माध्यमांतून आणखी प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले. चुकीच्या ऐकीव माहितीवर किंवा चुकीच्या फीडवर त्यांनी विधान केलेल असावे," अशी शक्यताही अमोल कोल्हे यांनी वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com