Thursday, April 25, 2024
Homeराजकीयकिरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस

किरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस

मुंबई | प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील कोर्लाई आणि महाकाली येथील जागेच्या खोट्या प्रकरणी बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची आणि पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठविली आहे.

- Advertisement -

सोमय्या यांनी या दोन्ही प्रकरणात जाहीर माफी न मागितल्यास सिव्हील आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे.

काही महिन्यांपुर्वी सोमैय्या यांनी मनीषा रविंद्र वायकर तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच ही माहिती निवडणुक आयोगापासून लपविल्याचा दावा केला होता.

एवढेच नव्हे या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. याशिवाय महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले आणि शाहीद बलवा यांच्याकडून रुपये २५ कोटीं रुपयांचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमैय्या यांनी केला होता.

रवींद्र वायकर यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. आपली जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. सातत्याने बिनबुडाचे आरोप करीत नाहक आपली, कुटुंबाची तसेच पक्षाची बदनामी केली, असे सांगत वायकर यांनी सोमैय्या यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या