Saturday, May 11, 2024
Homeराजकीयसीईटीबाबत आठ दिवसात निर्णय

सीईटीबाबत आठ दिवसात निर्णय

पुणे / Pune

सीईटीबाबत चर्चा सुरू आहे. तालुका स्तरावर सीईटी घेता येऊ शकेल. सीईटीची स्वायत्त संस्था आहे. त्यांना वैयक्तिक अधिकार आहे. आणिबाणीची स्थिती बघून बारावीसाठी सीईटी रद्द करण्याचा विचार करतोय. याबाबत चर्चा करून सात ते आठ दिवसांत निर्णय होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

- Advertisement -

महाविकास आघाडीतील तीनही पक्षात उत्तम समन्वय असून अतिशय उत्तमरीत्या कामकाज सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याचे जे कोणी सांगत आहे, ते यातून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. दरम्यान, ठाकरे कुटुंबीयांना संपूर्ण देश ओळखतो त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असेही ते म्हणाले.

सामंत म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांना संपूर्ण देश ओळखतो त्यांच्यावर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु असं असलं तरी महाराष्ट्रातील जनता विरोधकांच्या आरोपांमुळे चलबिचल होणार नाही. अधिक ताकदीने महाराष्ट्रातील जनता ठाकरे कुटुंबीयांच्या पाठीशी उभी राहील. असा विश्वास तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील तीनही पक्षात उत्तम समन्वय असून अतिशय उत्तमरीत्या कामकाज सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी पटत नसल्याचे जे कोणी सांगत आहे, ते यातून स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबईतील जवळपास ७० टक्के कोकणी जनता गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. महाविकासआघाडी तीनही पक्ष कोकणवासियांची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. त्यामुळे विरोधकांनी कोकणी लोकांविषयी कसलीही टीका करू नये. कोकणी जनता आजही शिवसेनेसोबतच असल्याचा दावाही उदय सामंत यांनी केला.

आदित्य ठाकरे यांची निवड योग्य

पद्म पुरस्कारांच्या शिफारस समितीवर आदित्य ठाकरेंची निवड योग्यच आहे. तरुण आणि प्रतिभा असलेल्या नेतृत्वावर विश्वास टाकायलाच हवा. तसेच टीका करणार्‍यांवर लक्ष देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. उद्या कोर्टात तारीख असल्यामुळे आज मी त्या विभागाचा प्रमुख असल्याने बोलणे उचित नाही. परीक्षेसंबंधी जो विचार पूर्वी केला होता, तोच विचार आत्ता करतोय. कोविडची परिस्थिती बघता परीक्षा घेता येणार नाही, आणि हेच प्रतिज्ञापत्र आम्ही कोर्टात दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात लवकरच तज्ज्ञांची कृती समिती

केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात लवकर तज्ज्ञांची कृती समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. धोरणातील विविध तरतुदींची अंमलबजावणी व बदल करण्याबाबत पुढील एक-दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मिती निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असे सामंत यांनी नमुद केले.

महाविद्यालये बंद असून दुसऱ्या वर्षापर्यंतच्या परीक्षाही होणार नाहीत. त्यामुळे जिम, प्रयोगशाळा, ग्रंथालये बंद आहेत. देखभाल-दुरूस्तीचाही खर्च नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. तसेच प्रवेश शुल्कामध्येही या बाबींचा समावेश न करता केवळ शिक्षण शुल्क घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये. याबाबत बैठक घेणार असून आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये औषधनिर्मिती विद्यापीठ

औरंगाबादमध्ये औषधनिर्मितीशास्त्र संबंधी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २५ ते ३० एकर जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. केंद्र शासनाकडे प्रस्तावही गेला आहे. पण त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे या प्रस्तावासह केंद्र शासनाकडे गेलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या