Nitin Gadkari Threat : नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिस सतर्क

Nitin Gadkari
Nitin GadkariMSME NYCS

दिल्ली | Delhi

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन (Threatening Phone Call) आला आहे. फोन करणाऱ्याने मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे असं सांगत धमकी दिली. नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याबाबत माहिती देण्यात आली आहे.

पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी दोनदान नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी फोन आला होता. त्याप्रकरणी एएनआयचा तपास सुरु आहे. आता पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा धमकीचा फोन करण्यात आला आहे.

जयेश पुजारी नावाच्या व्यक्तीने पहिल्यांदा हा धमकीचा फोन केला होता, त्यानंतर त्याने १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. २१ मार्च रोजी दुसऱ्यांदा त्यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देण्यात आली. दुसऱ्यांदा फोन केला असता त्याने १० कोटी रुपयांची खंडणी मागितली.

दरम्यान, नितीन गडकरींना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी (Police) अटक केली होती. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर येथील तुरूंगात करण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com