
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पवार यांच्या निवासस्थानी फोन करुन धमकी देण्यात आली आहे. या वृत्ताने सध्या एकच खळबळ उडाली आहे...
याप्रकरणी सिल्वर ओकमधील टेलिफोन ऑपरेटरने ग्रामदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राऊत यांनी तक्रार दाखल केली आहे. शरद पवारांना धमकी देणारी व्यक्ती बाहेरच्या राज्यातील आहे. ती विकृत आहे की त्याच्यावर मानसिक परिणाम झाला आहे, याची चौकशी करण्याचं काम पोलीस करत आहेत.
परंतु, त्यांचे फोन येते होते, ती व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. अतिशय खराब शब्द वापरत होती. दिवाळीत हे फार चालू होते. तेव्हा तक्रार केल्यानंतर ही व्यक्ती सापडली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.