दाऊदने फोन केला म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही

चंद्रकांत पाटलांच्या आरोपाने खळबळ
दाऊदने फोन केला म्हणून नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही

मुंबई | Mumbai

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणाशी संबंध (money laundering case linked to Dawood Ibrahim) असल्याचा आरोप करत ईडीने नवाब मलिक (Nawab Malik) यांना २३ फेब्रुवारी रोजी अटक केली.

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेत मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्याचं ठरवलं आहे. यामुळेच आज भाजपकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे.

दरम्यान भाजप प्रदेश अध्‍यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खळबळजनक आरोप केला आहे. दाऊदने फोन केला म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा खळबळजनक आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आयोजित मोर्चाकडे जात असताना पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा आरोप केला. चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाने राजकीय वर्तूळात मोठी खळबळ माजली आहे.

चंद्रकांत पाटील बोलतांना म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर ममता दीदींचा नाही तर दाऊदचा दबाव आहे. त्यामुळे ते नवाब मलिकचा राजीनामा घेत नाहीए. दाऊदने फोन केला म्हणून ते त्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. तर नवाब मलिक यांची तात्काळ हकालपट्टी करा अशी देखील मागणी चद्रकांत पाटील यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com