Wednesday, May 8, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांना दिलासा नाहीच! २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवाब मलिकांना दिलासा नाहीच! २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकारमधील (MVA Govt) मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रकरणी आज न्यायालयात (Court) पुन्हा सुनावणी झाली.

- Advertisement -

नवाब मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती आणि ती आज संपली असून सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयानं (Special PMLA court) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावली आहे.

Hina Khan : हिनाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लॉन्डिरग प्रकरणात (Dawood Ibrahim money laundering case) नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर २३ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी (Enforcement Directorate) कोठडीत पाठवले होते. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी (ED) कोठडी सुनावली होती.

गायक आदित्य नारायणच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

दरम्यान नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे ते आता जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Dawood Ibrahim money laundering case Ncp Leader Nawab Malik Sent To Judicial Custody By Special Pmla Court In Mumbai)

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

- Advertisment -

ताज्या बातम्या