
भोपाळ | Bhopal
दाऊद गॅंगकडून (Dawood Gang) भाजप खासदाराला (BJP MP) धमकी देण्यात आली आहे. भाजप खासदाराला अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे....
भोपाळमधील (Bhopal) भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) यांना ही धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या अज्ञाताने स्वतःची ओळख दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) भाऊ इक्बाल कासकरचा (Iqbal Kaskar) माणूस अशी सांगितली आहे. तसेच 'तुझी हत्या होणार आहे, असेदेखील त्याने म्हटले आहे.
याप्रकरणी भोपाळमधील टीटी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रज्ञा ठाकूर (Pragya Thakur) यांच्यासोबत असलेल्या या संभाषणाचा व्हिडीओदेखील काही लोकांनी रेकोर्ड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल होत आहे.