मेळाव्याच्या काही तास आधी CM शिंदेंचं ट्वीट; म्हणाले...

मेळाव्याच्या काही तास आधी CM शिंदेंचं ट्वीट; म्हणाले...

मुंबई | Mumbai

शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर मुंबईत आज दोन दसरा मेळावा होत आहेत. शिंदे गटाकडून मुंबईतील बीकेसी मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानही सज्ज झालं आहे.

दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन्ही गटाचे समर्थक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गर्दीची स्पर्धा दोन्ही गटाकडून सुरू झाली आहे. या दोन्ही मेळाव्यांची उत्सुकता शिगेला पोहचेलली असतानाच शिंदेंनी नवा टीझर शेअर केला आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री शिंदेंनी, “मराठी अस्मितेसाठी, मराठी बाण्याचं तेज राखण्यासाठी, हिंदुत्वाचा अमुल्य ठेवा जपण्यासाठी… आपण भेटतोय बीकेसी मैदानावर. दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,” या कॅप्शनसहीत हा टीझर शेअर केला आहे. चला बीकेसी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे.

हिंदुत्वाच्या सन्मानाचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दसरा मेळावा. आपल्या अभिमानाचा शिवसेनेचा दसरा मेळावा, असा मजकूर या टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे वारकरी, भांगडा करणारे पंजाबी बांधव, दाक्षिणत्य कला सादर करणारे कलाकार यासारखी दृष्य या टीझरमध्ये दिसत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com