Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्या“सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर...”; अनिल परबांचे जाहीर आव्हान

“सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर…”; अनिल परबांचे जाहीर आव्हान

मुंबई | Mumbai

दापोलीतील वादाच्या भोऱ्यात सापडलेलं साई रिसॉर्टवर आज तोडकामाची कारवाई होणार होती. यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे स्वतः दापोलीत पोहोचले होते. मात्र, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने तोडकामावर स्थगिती असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर टीकास्त्र सोडले आहे. सोमय्या यांच्यात हिम्मत असेल तर शिंदे गटातील नेत्यांवर बोलावे, असे जाहिर आव्हान त्यांनी दिले आहे. साई रिसॉर्टला कोर्टाच संरक्षण आहे. त्या रिसॉर्टशी माझा संबध नाही. असे सांगत अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे परब यांनी म्हटले आहे.

या रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजबून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत. सदानंद कदम माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीत कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशांतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे. तसेच, सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही परब यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या