Friday, April 26, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर विरोधकांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई | Mumbai

राज्यातील कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. याचपार्श्वभूमीवर चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा चार तासांचा आहे. त्यातून परिस्थितीचं आणि संकटाचं गांभीर्य कसं कळणार, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. अनेक विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे.

कोकण दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मी वैफल्यग्रस्त नसल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस टीकेला उत्तर देतांना म्हणाले, “त्याच्यावर मला काही राजकीय बोलायचं नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचं समाधान आहे. आम्ही त्याचं राजकारण करत नाही. पण मग जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत? मग येथे मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली.

तसेच, “तुम्ही येता आणि जाता….मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिलं नाही. गेल्यावेळचे निसर्ग वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”. असा टोला त्यांनी लागावला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या कोकण दौऱ्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले. तुमचे पाय सरकार आल्यापासून वर हवेत गेले आहेत. ते आता जमिनीवर येत आहेत, त्याबद्दल आनंद आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. ते पुण्यात बोलत होते.

भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, ‘ते आले…अन् न पाहताच निघून गेले. मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द, असे निलेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे. कोकणी माणसाने समजून जावं शिवसेना आपल्याला भावनिक करून संपायलाच निघाली आहे, असा आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

भाजपा नेत्या चित्र वाघ

- Advertisment -

ताज्या बातम्या