इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

इंधन दरवाढ, महागाई विरोधात काँग्रेसची सायकल रॅली

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

इंधन दरवाढ आणि महागाईविरोधात काँग्रेसतर्फे शनिवार 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली.

या आंदोलनात आमदार शिरीष चौधरी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष शाम तायडे , एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, दिलीप पाटील , उदय पाटील, प्रभाकर सोनवणे, भगतसिंग पाटील, , प्रदीप पवार, राजीव पाटील, बाबा देशमुख, प्रदीप सोनवणे, दीपक सोनवणे, जगदीश गाढे, मुजीब पटेल, अमजद पठाण आदी सहभागी झाले होते.

सायकलीवर स्वार होवून माजी खासदारांसह आमदारांनी रॅलीत सहभाग नोंदवून लक्ष वेधले होते. काँग्रस भवन आवारामधून या रॅलीला सुरुवात करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयावर या रॅलीचा समारोप करण्यात आला.

या वेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यासाठी मोदी सरकारला जाग येण्यासाठी तसेच जनमताचा दबाव मोदी सरकारच्या विरोधात वाढावा म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बोलतांना सांगितले.

मंत्रीमंडळाचा चेहरा बदलणे पुरेसे नाही, इंधनाचे भाव कमी करणे आवश्यक आहे, फालतू मलमपट्टया करु नका, पहिल्यांदाचा इंधनाचे भाव कमी करा, तरच जनता टिकून राहिल. नाहीतर जनता टिकून राहू शकणा नाही.

हे जर झाल नाही तर जनतेचा रोष सहन करावा लागणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी ही सायकल रॅली काढली असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com