राणा दाम्पत्यावर 'राजद्रोहाचा' गुन्हा नोंदवणं चुकीचं; मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

राणा दाम्पत्यावर 'राजद्रोहाचा' गुन्हा नोंदवणं चुकीचं; मुंबई सत्र न्यायालयाचे निरीक्षण

मुंबई | Mumbai

न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र बुधवार (४ मे) न्यायालयाने जामीन मंजूर केला.

गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले आहे. आता या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवल्याचे समोर आले आहे.

राणा दाम्पत्याविरोधात लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच, यावरून मुंबई पोलिसांनाही न्यायालयाने फटकारले आहे.

नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर लावण्यात आलेला राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच राणांविरोधात राजद्रोहाचं कलम चुकीचं आहे असं म्हणतानाच, राणा दाम्पत्याने राज्यघटनेत दिलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सीमा ओलांडली असंही मत व्यक्त केलंय.

Related Stories

No stories found.