Friday, April 26, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकार संकटात

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकार संकटात

संगमनेर (प्रतिनिधी)

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून नामदार बाळासाहेब थोरात हे राज्यात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे. सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे. मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच रायातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टिका सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

- Advertisement -

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या 54 व्या गळित हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील होते तर अध्यक्षस्थानी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे होते.यावेळी व्यासपीठावर खा.राजीव सातव,आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी,आशिष दुआ, बी.एम. संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, बाजीराव पा.खेमनर, अ‍ॅड. माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख, मोहनदादा जोशी, पृथ्वीराज साठे,कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे आदी उपस्थित होते.

एच.के.पाटील म्हणाले, संगमनेरचा सहकार हा देशात मॉडेल ठरणारा आहे. सहकारातून ग्रामीण भागात नंदनवन झाले. शेतकरी समाधनी झाले.अडचणीच्या काळात ही थोरात कारखान्याने लौकिक जपला आहे. दरवर्षी एफआरपी पेक्षा ही 100 रुपये जादा भाव दिला. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे देवरुपी माणूस होते. आदर्श संस्था व दुरदृष्टीतून त्यांनी हा विभाग समृध्द करतांना राज्यात नामदार बाळासाहेब थोरात यांचे सारखे कतृत्वान नेतृत्व दिले असल्याचे सांगून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळाला तर शेतकरी समाधानी होणार असल्याचे ही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या