प्रकाश जावडेकर यांच्या 'त्या' आरोपांना राजेश टोपें यांचे प्रत्युत्तर,म्हणाले...

प्रकाश जावडेकर यांच्या 'त्या' आरोपांना राजेश टोपें यांचे प्रत्युत्तर,म्हणाले...

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रासोबतच इतर काही राज्यांनी केंद्र सरकारकडे लसींचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय माहिती व दूरसंचार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'महाराष्ट्रात ५ लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही', अशा शब्दात राज्य सरकारवर सुनावलं होत.

प्रकाश जावडेकर यांचा आरोप फेटाळून काढत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रकाश जावडेकर यांना प्रत्त्युत्तर दिलं आहे.

राजेश टोपे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे.'

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com