Wednesday, April 24, 2024
Homeराजकीय'ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याच्या' दाव्यावर प्रियांका गांधींचा हल्लाबोल

‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू न झाल्याच्या’ दाव्यावर प्रियांका गांधींचा हल्लाबोल

दिल्ली | Delhi

देशात करोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फार भयानक होती. या काळात देशात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता भासली होती. अनेक रुग्णांचे मृत्य झाले होते.

- Advertisement -

पण केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) राज्यसभेत (Rajya Sabha) करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला.

दरम्यान केंद्र सरकारच्या या दाव्यावरुन राजकारण पहायला मिळत आहेत. काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्विट (Priyanka Gandhi Tweet) केले आहे की, ‘महामारीच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही.’

दरम्यान, कॉंग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल (Congress KC Venugopal) यांनी राज्यसभेत सरकारला विचारले होते की, दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे कोविड-19 रुग्ण मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि रुग्णालयात मरण पावले, हे खरे आहे काय? त्यास उत्तर देताना आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी सांगितले, आरोग्य हा राज्याचा विषय आहे. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश नियमितपणे मृत्यूची नोंद करताना, विस्तृत मार्गदर्शक सूचनांनुसार नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे रुग्ण प्रकरणे आणि मृत्यूची नोंद करतात. विशेषत: ऑक्सिजनच्या अभावामुळे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

तसेच राज्यसभेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी कोविड-19 (COVID19) मुळे देशभरात होणाऱ्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. सरकार याबाबत माहिती लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, ‘सरकारला आमचा प्रश्न आहे की तुम्ही आकडेवारी का लपवत आहात? कोविड-19 मुळे किती लोकांनी प्राण गमावले आहेत ते सांगा. सरकारी अधिकृत आकडेवारीत जितकी मृतांची संख्या नोंदविली जात आहे, त्यापेक्षा बरीच जास्त संख्या अहवालात सांगितली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या