विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी

jalgaon-digital
1 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. 3 डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

आता मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोट निवडणूक-2020 च्या उर्वरीत कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

त्यानुसार 1 डिसेंबर रोजी मतदान सुरळीतपणे पार पडले असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आज दि. 2 डिसेंबर रोजीच्या पत्रान्वये या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे तथा नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोट निवडणूकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता नवीन नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे सुरु करण्यात येणार आहे.

तसेच सुरक्षा कक्षात ठेवण्यात आलेल्या मतपेट्या मतमोजणीसाठी 3 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सुरक्षा कक्षातून बाहेर काढण्यात येणार आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *