आ. काळे किती दिवस आयत्या पिठावर रेघा मारणार

नगरसेवक कांबळे व निखाडे यांचा सवाल
आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

मतदारसंघात स्नेहलता कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून अनेक कामे, प्रश्न मार्गी लावल्यामुळे गावचा विकास कसा करायचा, हे विकासकामातून दाखवून दिले. काही कामे प्रगतिपथावर तर काही अंतिम टप्प्यात आहेत.

विद्यमान आमदारांना कुठल्याही प्रकारचा अद्याप निधी मिळाला नाही. स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर करून आणलेल्या कामावरच आयत्या पिठावर रेघा मारण्याचे काम आ. काळे करीत असून अजून किती दिवस आयत्या पिठावर रेघा मारणार असा सवाल नगरसेवक कांबळे व स्वप्नील निखाडे यांनी केला आहे.

दिलेला शब्द पूर्ण करून दाखविणार अशी कामाची पध्दत स्नेहलता कोल्हे यांची आहे. स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात विकास कसा असावा हे दाखवून दिले .त्यांनी कसा विकास केला याची पाहणी करता करता विद्यमान आमदार दमछाक झाली. शहराच्या विकासासाठी विद्यमान आमदारांचे योगदान शून्य आहे. त्यांनी फक्त मिटिंगा, आश्वासने दिली. गाजावाजा करून विकास होत नसतो.

त्यासाठी पाठपुरावाच करावा लागतो. शहराच्या विकासाच्यादृष्टीने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही, असे आमदार या शहराला मिळाले, अपयशी सरकार सारखे, अपयशी आमदार, त्यांना आयत्या पिठावर रेघा मारल्याशिवाय मतदारसंघात काहीच शिल्लक राहिले नाही. विधानसभेच्या निवडणुकीत लक्ष्मीनगरच्या जनतेला सांगितले होते की, लक्ष्मीनगरच्या जनतेला 7/12 मिळणार नाही हे आमदारांनी दिलेलं गाजर आहे, अशी मोठे मोठी भाषणबाजी केली.

आणि आता तेच 7/ 12 लवकर मिळावा म्हणून निवेदन देताना फोटो सोशलवर टाकत आहेत.आयत्या पिठावर रेघा मारायची सवय असल्याने हे कामपण आमच्यामुळेच होणार असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला जात आहे. लक्ष्मीनगरच्या नागरिकांना माहीत आहे हा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी किती प्रयत्न केले व करीत आहेत. विश्वास नसेल तर प्रत्येकाच्या घरात जाऊन विचारा याचे उत्तर मिळेल. विद्यमान आमदारांमुळे नव्हे माजी आमदारांमुळेच लक्ष्मीनगर भागातील प्रश्नाला चालना मिळाली आहे हे आ. काळे यांना विसरून चालणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com