Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'नुसतीच 'मन की बात', थोडे कामाचेही बोलायला हवं होतं'

‘नुसतीच ‘मन की बात’, थोडे कामाचेही बोलायला हवं होतं’

दिल्ली | Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी देशातील काही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला आणि राज्याची करोना परिस्थिती जाणून घेतली. यात झारखंडचे मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांचाही समावेश होता.

- Advertisement -

मोदींनी आपल्याची फोनवरून संवाद साधल्याची माहिती हेमंत सोरेन यांनी ट्विट करून दिली. मात्र यासोबत त्यांनी पंतप्रधानांवर लावलेल्या आरोपांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. पंतप्रधानांनी फोन केला पण ऐकून न घेता फक्त स्वतःचंच सांगत बसले असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘आज आदरणीय पंतप्रधानांनी फोन केला. त्यांनी केवळ आपल्या ‘मन की बात’ केली. त्यांनी कामाच्या गोष्टी केल्या असल्या आणि कामाची गोष्टी ऐकल्या असल्या तर बरं झालं असतं’ असं आपल्या ट्विटमध्ये हेमंत सोरेन यांनी म्हटलंय.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये झारखंड राज्यालाही संसाधनांचा तुटवडा भासत आहे. आपल्या अपेक्षित मदत मिळत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. झारखंडचे आरोग्य सचिव अरुण सिंग म्हणाले की, राज्याला रेमडेसिविर इंजेक्शनच्या फक्त २,१८१ कुप्या उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. इतर कोणतीही मदत आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. झारखंडला बांग्लादेशक़डून रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५० हजार कुप्या आयात करायच्या आहेत. मात्र, अजूनही परवानगी मिळालेली नाही’.

तसेच, ‘झारखंडमध्ये १.५७ कोटी लाभार्थ्यी लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण खोळंबलं आहे. झारखंड सध्या प्रतिदिन ६८० टन ऑक्सिजन निर्माण करत आहे, मात्र त्यांची गरज केवळ ८० टन आहे. मात्र, तिथे कन्टेनर्स, सिलेंडर्स आणि वेपराईझर्सचा तुटवडा आहे. याबद्दल मुख्यमंत्री सोरेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याकडे मदत मागितली होती. मात्र, अद्याप ती मिळालेली नाही.’

हेमंत सोरेन हे बहुदा करोना काळात पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. हेमंत सोरेन यांचे ट्विट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही आता हळूहळू पंतप्रधानांवर टीका करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या