'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच'

धनंजय मुंडेंचे ट्विट
'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच'

मुंबई | Mumbai

गेल्या वर्षभरापासून करोनाच संकट सुरु आहे. अनेक मोठमोठे नेते, सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

आता भाजपा नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना देखील करोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंकजा मुंडे याना करोनाची लागण समजताच त्यांचे बंधू आणि समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हंटल आहे की. "ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या ताई." असं संजय मुंडे यांनी म्हंटल आहे.

दरम्यान, गेल्या ४ ते ५ दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आज, त्याचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. पंकजा मुंडे यांनी म्हंटल आहे की, म्हटले की, “मी करोना पॉझिटीव्ह झाले असून अगोदरच विलीकरणात आहे, करोना बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन. माझ्या समवेत दौऱ्यात असणार्‍यांनी टेस्ट करून घ्यावी, काळजी घ्यावी” असे त्यांनी म्हंटल आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com