घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत पाच जणांनाच परवानगी
राजकीय

घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत पाच जणांनाच परवानगी

निवडणूक आयोगाची नवी नियमावली

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

नवी दिल्ली |New Delhi -

करोना संकटामुळे निवडणुकांचं आयोजन कसं करावं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार घरोघरी प्रचारासाठी उमेदवारासोबत पाच जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. Election Commission of India


येत्या काही दिवसांत बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तेथील राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडूनही याची तयारी सुरू करण्यात आली आहे. करोना काळात डोर टू डोर कॅम्पेनिंग करताना उमेदवार आपल्या सोबत जास्तीत जास्त 5 लोकांना नेऊ शकणार आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभा आणि रोड शो ला परवानगी देण्यात आली आहे. बिहार विधानसभेचा कालावधी 29 नोव्हेंबरला संपतोय, त्या पार्श्वभूमीवर ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहेत नियम?

उमेदवाराचा अर्ज भरताना त्याच्यासोबत केवळ दोनच व्यक्तींना जाण्यास परवानगी.

मतदान करायला गेल्यावर तिथे करोनाची लक्षणं दिसल्यास मतदाराला एक टोकन देऊन परत पाठवलं जाईल, सर्वात शेवटी त्याचं मतदान नोंदवलं जाईल

मतदान कक्षात रजिस्टरवर सही करण्यासाठी, ईव्हीएमचं बटण करण्यासाठी मतदाराला ग्लोव्हजची व्यवस्था केली जाईल.

सर्व मतदारांनी चेहर्‍याला मास्क लावूनच मतदानाला यावं, फक्त मतदान कक्षात प्रवेश करण्याआधी त्यांना मास्क काढून ओळख पटवावी लागेल. रांगेत उभं राहतानाही सोशल डिस्टन्सिंगनं राहावं लागेल.

एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1 हजार लोकांचंच मतदान ठेवलं जाईल, याआधी ही मर्यादा दीड हजार इतकी होती. करोना काळात कमी गर्दीसाठी हा उपाय केला जाईल.

मतदानाच्या प्रचारासाठी एखादं मैदान निश्चित करताना तिथे प्रवेश आणि निर्गमनाचे वेगवेगळे मार्ग आहेत का याची खात्री केली जाईल. मैदानावर लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करुनच बसवलं जाईल.

कोविड काळात जितक्या लोकांना परवानगी आहे, त्यापेक्षा अधिक लोक या सभेला एकत्रित येणार नाहीत यावर निवडणूक अधिकारी बारकाईनं लक्ष ठेवतील.

पोस्टल बॅलेटची सुविधा ही अपंग, 80 वर्षांपेक्षा अधिक वृद्धांसह कोविड पेशंट, होम क्वारंटाईन झालेले संशयित यांनाही दिली जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com