Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याडोन्ट टॉक टू मी...! सोनिया गांधी स्मृती इराणींवर भडकल्या

डोन्ट टॉक टू मी…! सोनिया गांधी स्मृती इराणींवर भडकल्या

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

काँग्रेस (Congress) खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे आज संसदेत मोठा गदारोळ झाला…

- Advertisement -

गदारोळ झाल्याने लोकसभेचे (Loksabha) कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. यानंतर सभागृहाबाहेर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यात जोरदार वादावादी झाली.

आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार

लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर ‘सोनिया गांधी माफी मागा’ अशा घोषणा भाजप (BJP) खासदार देत होते. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी घोषणाबाजीतच भाजप खासदार रमा देवी (Rama Devi) यांच्याकडे जात अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचं सांगितलं.

आर्थिक व्यवहार आत्ताच उरकून घ्या! ऑगस्टमध्ये ‘इतक्या’ दिवस बँका बंद

त्याचवेळी रमा देवीजवळ उभ्या असलेल्या स्मृती इराणी यांनी सोनिया गांधी यांना उद्देशून वक्तव्य केले. यावेळी सोनिया गांधी संतापल्या आणि त्यांनी स्मृती इराणी यांना डोन्ट टॉक टू मी से सुनावले.

नाशिक जिल्हा परिषदेचे ‘असे’ आहे गट आरक्षण; वाचा सविस्तर

यावरुन स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाली. तब्बल 2 ते 3 मिनिटे हा वाद सुरु होता. खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवला.

- Advertisment -

ताज्या बातम्या