Friday, April 26, 2024
Homeराजकीयदेवपुरात रस्त्यांची चाळणः आमदार शाह संतापले !

देवपुरात रस्त्यांची चाळणः आमदार शाह संतापले !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील देवपूर परिसरात रस्त्यांची चाळण झाल्यामुळे आ. फारूख शाह यांनी बैठकीत संताप व्यक्त करून जयहिंद जलतरण ते जयहिंद वरिष्ठ महाविद्यालयापर्यंत रस्ता व गटार आठ दिवसांच्या आत करण्याची सुचना आ. शाह यांनी दिली.

- Advertisement -

आ.शाह यांना काही सामाजिक संघटना, नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदने दिली होती. या निवेदनांची दखल घेवून आ. शाह यांनी आज धुळे महापालिका, सार्वजनिक बांधकाम व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच वीज वितरण कंपनी यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. व धुळेकर नागरिकांनी केलेल्या समस्यांचा पाढा बैठकीत वाचण्यात आला.

बैठकीत आ.शाह यांनी विविध कामांचा आढावा घेवून देवपुरातील रस्त्यांची चाळण झाल्याबदल त्यांनी संताप व्यक्त केला. व रस्त्यांची पाहणी त्यांनी अधिकार्‍यांसह केली.

शहरात विविध ठिकाणी घरकुल बांधणेे, सन 2000 पूर्वीचे अतिक्रमित घरांना नियमित करून सातबारा उतारा देणे, भुयारी गटारींमुळे रस्त्याची दुर्दशा झाली. त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, शहरातील नाले सफाई करणे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणे, वीज वितरण कंपनीच्या वाढत्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, जास्तीचे वीज बिल न आकारणे यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

कोणतेही दिरंगाई न करता कामे पूर्ण करावीत अशी सुचना आ. शाह यांनी दिली. बैठकीला मनपाचे सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी, शहर अभियंता कैलास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. वर्षा घुगरी, उप अभियंता एजाज शाह, वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता एन. बी. गांगुर्डे, उपकार्यकारी अभियंता रवींद्र पवार, दुर्गेश साळुंखे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप विभागीय अभियंता दीपक कुलकर्णी, शाखा अभियंता डी.डी. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एस. धोतरे, परवेज शाह, हाजी शाकीब शाह, निलेश काटे, आसिफ पोपट शाह, सऊद आलम, शाहीद टिपू , अफसर शाह आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या