आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही षडयंत्र

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातही षडयंत्र

- उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा Son of actor ShahRukh Khan आर्यन खानचा Aaryan Khan ड्रग्ज प्रकरणाशी drugs case किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट झाले असून हे एक षडयंत्र होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक Chief Spokesperson of NCP Nawab Malik यांनी शनिवारी न्यायालयाच्या निकालावर judgment of the court केला.

मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो आणि न्यायालयाच्या आदेशावरून ते स्पष्ट झाले आहे, असेही मलिक म्हणाले. आता अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतील. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस न्यायालयाने जामीन दिल्यावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे. आता अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असेही मलिक यांनी सांगितले.

समीर वानखेडे खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहेय. त्यांचे खंडणी वसूल करण्याचे धंदे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने भूमिका घेऊन अशा भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी मलिक यांनी केली. आताही वानखेडे यांची पाठराखण झाली तर यामागे भाजपचा हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.