Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याशुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट विधानसभा परिसरात शिंपडलं गोमूत्र... Video...

शुद्धीकरणाचे लोण आता कर्नाटकमध्ये, काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट विधानसभा परिसरात शिंपडलं गोमूत्र… Video व्हायरल!

बंगळुरू | Bangalore

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत १३५ हून अधिक जागा मिळवत काँग्रेसने मुसंडी मारली. काँग्रेसने भाजपाला पराभवाची धूळ चारली. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली होती.

- Advertisement -

डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या अशी दोन्ही नावं चर्चेत होती. त्यापैकी सिद्धरामय्यांचं नाव फायनल झालं. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता काँग्रेसने सोमवारी कर्नाटक विधानसभेचे शुद्धीकरण केले. पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा भवनात गंगाजल आणि गोमूत्र शिंपडले तसेच हवन-पूजनानंतर हनुमान चालिसाचे पठण केले.

Accident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण गंभीर जखमी

भाजपाने आपल्या भ्रष्टाचाराने विधानसभा अशुद्ध केल्याचे काँग्रेसने सांगितले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (Deputy CM DK Shivakumar) यांनी यावर्षी जानेवारीतच, विधानसभेचे गोमूत्राने शुद्धीकरण करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते.

Sameer Wankhede : …तर माझाही आतिक अहमद होऊ शकतो;समीर वानखेडेंनी व्यक्त केली भीती

व्हायरल व्हिडीओत हे पाहायला मिळतं आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बादलीत गोमूत्र आणलं आहे. हे गोमूत्र विशिष्ट पद्धतीने शिंपडलं जातं आहे.विधानसभेच्या चारही दिशांना हे गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि पूजा करण्यात आली. हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Boat Accident : गंगा नदीत ४० जणांनी भरलेली बोट उलटली; चौघांना जलसमाधी, अनेक जण बेपत्ता

दरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी बंगळूरू यथे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते एसएम कृष्णा यांच्या पाया पडले. शिवकुमार यांनी चरणस्पर्श करुन त्यांनी कृ्ष्णा यांचे आशीर्वाद घेतले. तसेच शिवकुमार यांनी विधानसभेत प्रवेश करण्यापूर्वी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं देखील टेकवलं. तसेच माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मइ यांची भेट देखील घेतली.

- Advertisment -

ताज्या बातम्या