
दिल्ली | Delhi
काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald case).....
ईडीकडून (Enforcement Directorate) चौकशी करण्यात येत आहे. सलग दोन दिवस चौकशी केल्यानंतर आज पुन्हा एकदा ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहेत.
राहुल गांधी यांची सोमवारी (१३ जून) सुमारे ८.३० तास चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (१४ जून) ही चौकशी दहा तासांहून अधिक काळ चालली.
दरम्यान संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येत, ईडी कार्यालयाबाहेर टायर जाळले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काँग्रेसच्या काही नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.