Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार? शरद पवार म्हणाले....

कर्नाटकमध्ये कोणाचं सरकार येणार? शरद पवार म्हणाले….

सोलापूर | Solapur

कर्नाटकमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. यावरुन शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत.

- Advertisement -

येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी, कर्नाटकात भाजपवर जनता नाराज आहे. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर पवार यांनी भाजपची आता पाच-सहा राज्यात सत्ता असल्याचे सांगून भाजपला डिवचले आहे.

शरद पवार म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येईल. त्या ठिकाणी काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. तर अनेक राज्यात भाजपची सत्ता नाही. केरळ, तामिळनाडू राज्यात भाजपची सत्ता नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशमध्ये सत्ता नाही. गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यात भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंमुळे भाजपची सत्ता आलेली आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तेथे काही आमदार फोडून भाजपने आपली सत्ता आणलेली आहे. हरियाणा, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता नाही. आज केवळ पाच चे सात राज्यामध्ये सत्ता असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

शिर्डीत ६ हॉटेलवर छापा, १५ पीडित मुलींची सुटका

दरम्यान संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आलं. सीरिअस बोलण्यासाठी ज्यांचा लौकीक आहे. त्यावर मी बोललं पाहिजे. त्याबद्दल मला विचारा. पोरासोरांच्या विधानावर मी काय बोलावं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Char Dham Yatra : केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला… थरकाप उडवण्याऱ्या घटनेचा VIDEO व्हायरल

तत्पुर्वी, उप मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून भाजपाच्या संपर्कात असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. वर्षभरापूर्वी भालके गटाचा पराभव करून अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बनले आहेत. त्यामुळे शरद पवार यांची ही आगामी विधानसभेसाठी मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होणार, संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

- Advertisment -

ताज्या बातम्या