काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सावंत यांची केंद्र सरकारवर टीका

काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सावंत यांची केंद्र सरकारवर टीका

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh )यांच्यावर परमबीर सिंहयांनी केलेल्या आरोपांची सीबीआयने केलेल्या प्राथमिक चौकशीच्या अहवालाची सत्यता आणि स्वतः चे निर्दोषत्व सिध्द करायची जबाबदारी ही सीबीआयची आहे. मात्र, सीबीआयवर असलेला दबाव पाहता सत्य समोर येईल असे वाटत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत (Congress state spokesperson Sachin Sawant ) यांनी रविवारी ट्विट करून केली.

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या कथित १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सीबीआयने आपल्या प्राथमिक चौकशीत अनिल देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे मोदी सरकारचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्राथमिक चौकशीत सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याने असा निष्कर्ष काढला होता की परमबीर सिंह यांनी केलेल्या तथाकथित १०० कोटी वसुली आरोपात अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे अमित शहा यांनी जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, असे सावंत यांनी म्हटले आहे.

चौकशी यंत्रणा मोदी सरकारच्या विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी राजकीय शस्त्र कसे बनतात याचे हे स्पष्ट उदाहरण आहे. न्यायालयाची दिशाभूल केली जाते, नियम गुंडाळले जातात, चौकशा अंतहीन ठेवल्या जातात. अशी षडयंत्रे फक्त हुकुमशाहीत घडतात. लोकशाही वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र येण्याची वेळ आली आहे, असेही सावंत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com