काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपवर टीकास्त्र

काँँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ( Crop Damages ) झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मदतीपासून वंचित आहे, अशी टीका काँँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केली.

राज्यात भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर भाजपने मुंबई महापलिका निवडणुकीच्या तोंडावर आपले सरकार आले आणि हिंदू सणांवरचे विघ्न टळले, असा प्रचार सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, आजही पंचनामेच सुरु आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली.

आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. कृषी मंत्री हा शेती आणि शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा. पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, अशी टीका पटोले यांनी केली.

भाजप विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी ५० कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे. तसेच राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com