Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपची खेळी त्यांच्यावरच....!

भाजपची खेळी त्यांच्यावरच….!

नागपूर | Nagpur

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी विधान परिषदेचा निकाल (Legislative Council Result) लागल्यानंतर कथितप्रकारे बंड केले आहे. त्यानंतर राज्यामध्ये शिवसेनेत (Shivsena) खळबळ उडाली. यावरूनच राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress) ही खबरदारी घेत आहे. शिवसेनेचे नेते शिंदे यांच्या बंडानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) टीका केली आहे.

- Advertisement -

भाजप (BJP) हा पक्ष केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करीत दबावतंत्राचा वापर करून राज्यातील सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजपची (BJP) ही खेळी त्यांच्यावरच उलटेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी नागपुरात केला आहे.

केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकारणासाठी करणे, सत्ताप्राप्तीतून पैसा कमावणे आणि पैशातून पुन्हा सत्ता प्राप्त करणे, अशी पद्धत भाजपने (BJP) अंगीकारली आहे. ही बाब भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे. विधानपरिषदेत काँग्रेसची मते फुटली आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यासंदर्भातील अहवाल लवकरच पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाईल असे पटोले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या