काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले जिल्हा दौऱ्यावर

शेतकरी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासह बैठकांना हजेरी लावणार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले जिल्हा दौऱ्यावर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले हे बुधवार, 23 रोजी जिल्ह्यात येत असून भुसावळ येथे सकाळी 5.30 वा. त्यांचे आगमन होणार आहे.

प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर आमदार पटोले हे प्रथमच जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. आमदार पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकार्‍यांकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्याचे दहन आणि यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यातील शेतकरी व कार्यकर्त्यांचा मेळावा 23 रोजी सकाळी 9 वाजता फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

सकाळी 11.30 भुसावळ येथे रामचंद्र सभागृहात भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकर्‍यांंचा मेळावा आणि कार्यकर्ता संवाद, तर दुपारी 1 वा. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोविड सेंटरला भेट व कोविड योध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

त्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक दुपारी 3 वा. होईल. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक सायंकाळी 5 वा. काँग्रेस भवन येथे शहर व ग्रामीणमधील कार्यकर्त्यांशी संवाद, सायंकाळी 6 वा. एरंडोलकडे प्रयाण करणार आहे.

त्यानंतर रात्री 8 वा. अमळनेर येथे चोपडा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पारोळा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद तर रात्री 9.30 वा. किसान काँग्रेस बैठक होणार आहे. रात्री 10.30 वा. अमळनेर येथून धुळ्याकडे ते प्रयाण करणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com