काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला; भाजपला दिलासा

काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला; भाजपला दिलासा

मुंबई | Mumbai

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मतदानावर (Voting) काँग्रेसने (Congress) आक्षेप घेतला होता...

हा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) तो फेटाळला आहे. या निर्णयामुळे भाजपला (BJP) दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) दाद मागितली आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या तक्रारीवर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचा विषयी काँग्रेसने तक्रार केली आहे. या आमदारांऐवजी त्याचे समवेत इतर सहकारीने मतपत्रिका बॉक्समध्ये टाकल्या, असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला. काँग्रेसची तक्रार म्हणजे असंवेदनशील प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com