Saturday, May 11, 2024
Homeमुख्य बातम्याOBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलीय. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा चढलाय.

- Advertisement -

याच दरम्यान काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहले असून राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही पटोले यांनी पत्रातून केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे राज्यभरात ओबीसी आक्रोश आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याची गंभीर दखल घेऊन नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे.

महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या