Monday, April 29, 2024
Homeराजकीयखासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली

पुणे (प्रतिनिधि) – पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केलेल्या काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. सातव यांना झालेल्या न्युमोनियाचा संसर्ग कायम राहिला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

9 एप्रिलला सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर 23 एप्रिलपासून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान इतके दिवस त्यांची प्रकृती सुधारत असतानाच शुक्रवारी सातव यांना पुन्हा त्रास झाला आणि त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली.त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज रुग्णालयातील उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमध्यमांशी बोलताना सातव यांची प्रकृती सर्वसाधारण होत असताना त्यांना पुन्हा त्रास झाला परंतु ते लवकरच पुन्हा लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त केला.

- Advertisement -

एप्रिल महिन्यात खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

स्वतः राहुल गांधी राजीव सातव यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जहांगीर रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून सातव यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली होती. तर, दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही जहांगीर हॉस्पिटलमध्ये येऊन सातव यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या