Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याBharat Jodo यात्रेवर शोककळा! यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू

Bharat Jodo यात्रेवर शोककळा! यात्रेत चालताना खासदाराला हार्ट अटॅक, दुर्दैवी मृत्यू

दिल्ली | Delhi

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेली ‘भारत जोडो’ यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेदरम्यान एक दुख:द घटना घडली आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार संतोख सिंग चौधरी यांचे निधन झाले आहे. आज सकाळी फिलूर येथे पदयात्रेला प्रारंभ झाला तेव्हा संतोष सिंह चौधरी (Santokh Singh Chaudhari) यांना अचानक छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटू लागले. आजू-बाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोष सिंह यांना हार्ट अटॅक आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र पुढील उपचारादरम्यान संतोष सिंह यांचा मृत्यू झाला.

भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असताना काँग्रेस खासदाराच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. चौधरी यांच्या निधनानंतर भारत जोडो यात्रा स्थगित केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले आहेत.

संतोख सिंह चौधरी यांचा जन्म १८ जून १९४६ रोजी पंजाबमधील जालंधरच्या धालीवाल येथे झाला. ते ७६ वर्षांचे होते. संतोख सिंह चौधरी हे पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि जालंधर लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. चौधरी संतोख सिंग यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले आहे की, ‘जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीदेखील या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रेतच अटकळी जिल्हा नांदेड येथे काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. कृष्ण कुमार पांडे यांनी भारत जोडो यात्रेच्या झेंडा तुकडीचे संचालन केलं. त्याच दरम्यान त्यांना श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान जखमी झाले होते. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्या नंतर ते नागपुरात परत आले. भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असताना गर्दीत त्यांना धक्का लागून पडल्याने ते खाली कोसळले होते. त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय उजव्या हाताला आणि पायालाही इजा झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या