कोण रोहित पवार? पोरकटपणा म्हणत प्रणिती शिंदेंकडून खरपूस समाचार

jalgaon-digital
1 Min Read

सोलापूर | Solapur

सोलापूर (Solapur) लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. कारण आहे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीमध्ये (NCP) सुरु असलेल्या चढाओढीचं.

काही दिवसांपूर्वी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राष्ट्रवादीकडून सोलापूर मतदारसंघावर दावा केला होता. तेव्हापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये या मतदारसंघावरुन जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी खरपूस शब्दांत रोहित पवार यांचा समाचार घेतला आहे.

सोलापूर लोकसभेसंदर्भात रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारलं असता, प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, कोण रोहित पवार? म्हणत त्यांच्या वक्तव्याला किंमत न देण्याचा प्रयत्न केला. आमदारकीची त्यांची ही पहिलीच टर्म आहे. काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या, त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

तसेच प्रणिती शिंदे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार प्राणिती शिंदे यांनी निषेध केला. तसंच महिला आमदारच सुरक्षित असतील तर ,सर्वसामान्य महिला सुरक्षा कशी होणार, असा सवालही त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.

रोहित पवार यांनी काय म्हटलं होतं?

रोहित पवार यांनी म्हटलं होतं की, सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत लवकरच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा होणारा पराभव पाहून ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *