Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी; २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

नेमकं कारण काय?
Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील  यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी;  २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

धुळे | Dhule

काँग्रेसचे (Congress) आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या जवाहर सूतगिरणीवर (Jawahar Yarn Mill) छापेमारी (Raid) करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांपासून ही चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली असून अद्यापही तपास यंत्रणा तपास करत आहेत. राजकीय आकसापोटी ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा धुळ्याच्या (Dhule) राजकारणात रंगली असून या छापेमारीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही...

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील  यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी;  २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच
Accident News : पर्यटकांची बस १०० फूट खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहराजवळील जवाहर सहकारी सूतगिरणीत गेल्या २४ तासांपासून ही चौकशी सुरु असून आयकर विभागाकडून (Income Tax Department) ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे‎ पाच कारमधून सकाळी आयकर विभागाचे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील पथके जवाहर सहकारी सूतगिरणीच्या चौकशीसाठी आल्याचे सांगितले जात असून त्यांनी सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे (Security Guards) मोबाइल बंद केले आहेत. तसेच दूरध्वनी कट करत गोदामाच्या चाव्याही जप्त केल्याचे बोलले जात आहे.

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील  यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी;  २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंची पदकांची लयलुट सुरुच; नेमबाजीत आणखी एक सुवर्णपदक

जवाहर सहकारी सूतगिरणीचा ठेका गुजरातच्या (Gujrat) एका कंपनीला देण्यात आला असून त्या कंपनीच्या चौकशीसाठी हे पथक आल्याची माहिती मिळत आहे. तसेच सुताच्या मालाला उठाव नसल्यामुळे माल विक्री होत नाही. त्यामुळे गोदामात साठा पडून आहे. तर आज म्हणजेच (०१ ऑक्टोबर) पासून तिन्ही पाळ्यांचे कामकाजपुढील आदेशापर्यंत पूर्णत बिनपगारी बंद ठेवण्यात येत आहे. बाजारात सुधारणा झाल्यावर कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी सूचना (Instructions) सुतगिरणीच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे.

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील  यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी;  २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच
ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना झटका; गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ

दरम्यान, तपास यंत्रणेकडून (investigative agiance) या छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. तसेच या पथकाकडून‎ आज सकाळपर्यंत कार्यालयात‎ कागदपत्रे तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय सूतगिरणीचे ऑडिट पूर्ण झाले असून‎ संस्था 'क' दर्जामध्ये मोडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे असे‎ असतानाही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आमदार कुणाल पाटील यांनी या कारवाईबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नसून चौकशी झाल्यानंतर ते आपली भूमिका मांडणार असल्याचे समजते आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Kunal Patil : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील  यांच्या सूतगिरणीवर तपास यंत्रणांची छापेमारी;  २४ तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच
Rain Update : अतिवृष्टीचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान अंदाज
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com