Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; नाराजी दूर होणार का?

काँग्रेसचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; नाराजी दूर होणार का?

मुंबई | Mumbai

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) काँग्रेस (Congress) नेत्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता ही भेट होईल. यात बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे…

- Advertisement -

याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि नाना पटोले (Nana Patole) सहभागी असतील.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, जरी एका पक्षाचे सरकार (Government) असले तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचे सरकार आहे. यामुळे काही प्रश्न नक्कीच उद्भवले आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत.

दरम्यान, काँग्रेसबरोबर (Congress) दुजाभाव केला जात आहे का? अशी विचारणा केली असता थोरात म्हणाले की, असे काही मी म्हणणार नाही. प्रश्न आहेत हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीबाबतीतदेखील प्रामुख्याने प्रश्न असून आज ते सोडवले जाणार आहेत.

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेबाबत (Press conference) ते म्हणाले की, तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणे महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही.

संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. राज्यात १० मार्चनंतर मोठे बदल दिसतील असे सूचक विधानही त्यांनी केलेले आहे. यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या