धक्कादायक ! काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेस
काँग्रेस

झारखंड | Jharkhand

झारखंडच्या रामगड मध्ये सध्या पोटनिवडणूक (By-elections) सुरु आहे यासाठी २७ फेब्रुवारी मतदान होणार आहे. तर मतमोजणी २ मार्च रोजी होईल. येथील मतदान पार पडण्याआधीच भुरकुंदा पोलीस ठाण्याच्या (Bhurkunda Police Station) हद्दीत काँग्रेस नेत्याची गोळी झाडून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Cogress) नेते राजकिशोर बाउरी (Rajkishore Bauri) उर्फ बितका (३८) हे घरापासून १०० मीटरच्या अंतरावर एका पेट्रोल पंपाजवळ फोनवर चर्चा करत होते. त्यावेळी दुचाकीवरून तिघे जण आले आणि त्यांनी राजकिशोर यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

काँग्रेस
राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, देशाच्या संसदेत...

त्यानंतर राजकिशोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी (Doctor) तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. काँग्रेस आमदार यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. एका प्रकरणात काँग्रेस आमदार ममता देवी यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यांची जागा रिकामी झाल्यानंतर पोटनिवणडूक घेण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान, ममता देवी यांना एका प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच नियमानुसार, ममता देवी (Mamata Devi) या पुढील ११ वर्षे निवडणुकीत भाग घेऊ शकत नाही. अशा पार्श्वभूमीवर या मतदारसंघात आधीच तणाव निर्माण झाला होता, दरम्यान या हत्येमुळे येथील परिस्थिती आणखीनच चिघळली असून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु आहे.

काँग्रेस
मनीष सिसोदियांच्या अडचणी वाढणार
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com