Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यापराभवाच्या भीतीने भाजपची माघार; काँग्रेसची टीका

पराभवाच्या भीतीने भाजपची माघार; काँग्रेसची टीका

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे भाजपने जाहीर केले. मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण केली. यामुळे ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपाच्या या निर्णयानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

पराभवाच्या भीतीनेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली, असा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. सचिन सावंत म्हणाले की, भाजपने उमेदवार मागे घेतला असला तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही. यासोबतच सचिन सावंत यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे.

लटके यांना आमदार म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. याआधी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांचे काही महिन्यांपूर्वी दुबई येथे निधन झाले. यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. या रिक्त झालेल्या मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल तर उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके निवडणूक रिंगणात उतरले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या