प्रियांका गांधी दुसऱ्यांदा करोना बाधित, राहुल गांधींचीही प्रकृती बिघडली

प्रियांका गांधी दुसऱ्यांदा करोना बाधित, राहुल गांधींचीही प्रकृती बिघडली

मुंबई | Mumbai

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. स्वत: प्रियांका यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली. करोनाची लागण झाल्यानंतर त्या घरीच क्वॉरंटाईन होणार आहेत.

प्रियांका गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, 'आज कोविड चाचणी (पुन्हा) पॉझिटिव्ह आली. होम आयसोलेशनमध्ये राहणार असून सर्व कोविड प्रोटोकॉलचे पालन करिन.'

दरम्यान, प्रियांका गांधी यांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. याआधी ३ जून रोजी त्या करोना पॉझिटिव्ह होत्या. तेव्हा प्रियांका गांधी यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील करोना झाला होता. तेव्हा प्रियांका यांनी सौम्य लक्षणे आढळल्यानंतर करोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले होते.

तर दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी देखील आजारी आहेत. त्यामुळे राजस्थानातील अलवर दौरा त्यांनी रद्द केला आहे. अलवर काँग्रेसकडून आयोजित नेतृत्व संकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी सहभागी होणार होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com