वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन

मुंबई | Mumbai

काॅंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर (Congress Former Mla Madhukar) यांचे प्रदीर्घ आजाराने आज (गुरुवार, ता. 1१५) पहाटे पाचच्या सुमारास निधन झाले.

मधुकर ठाकूर गेल्या ३-४ वर्षांपासून आजारी होते. आज दुपारी २ वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

ठाकूर यांचा आजच वाढदिवस आहे. दुर्दैवाने वाढदिवशीच त्यांची प्राणज्योत मालवली. वाढदिनीच त्यांचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. मधुकर ठाकूर यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत तळागाळातून झाला होता.

झिराड ग्रामपंचायतीच्या (Zhirad Grampanchayat) सरपंचपदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि २००४ ते २००९ या काळात अलिबाग-उरण मतदारसंघाचे (Alibag-Uran constituency) ते आमदार होते. रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com