Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्या"शेवटी काय भाजपाचे संस्कार..."; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसची जळजळीत टीका, शेअर केला 'तो'...

“शेवटी काय भाजपाचे संस्कार…”; पंकजा मुंडेंवरून काँग्रेसची जळजळीत टीका, शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. पक्षाकडून त्यांना डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच दोन वेळा बीडचा दौरा केला. या दोन्ही वेळी मुंडे भगिनी फडणवीसांच्या कार्यक्रमात दिसल्या नाहीत. यामुळे पंकजा मुंडेंच्या नाराजीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

त्यातच भर म्हणजे आता ‘महाराष्ट्र काँग्रेस’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्या आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडे यांनी त्यांना बोलू देण्याची विनंती केली, मात्र, बावनकुळे यांनी मुंडे यांना त्यांच्या आधी बोलू दिलं नाही.

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर?; पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट, बावनकुळेंचे मोठे विधान

हा व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसनं भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जे स्वतःच्या पक्षातीलच एका महिला प्रतिनिधीला भर कार्यक्रमात बोलून देत नसतील ते त्यांच्या पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महिलेला काय स्थान देत असतील याचा विचार न केलेलाच बरा. शेवटी काय भाजपचे संस्कार म्हंटल्यावर असच होणार!’ अशी जळजळीत टीका काँग्रेसने भाजपावर केली आहे.

ATM फोडनं सुरू होतं, चोरांचा प्लॅन यशस्वी होत आला होता, पण जीव वाचवत पळावं लागलं… संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं?

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट भाजपात आहे. माझ्या कालच्या संपूर्ण दौऱ्यात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे तुम्ही नंतर बोला, मी आधी बोलतो, असं मी त्यांना म्हटलं,” हाच या व्हिडीओमागील आशय आहे, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण पक्षावर नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी जन्मापासूनच भाजपची कार्यकर्ता आहे. मुंडेसाहेब आणि भाजपला वेगळं करता येणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिली होती.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

- Advertisment -

ताज्या बातम्या